सोयाबीनच्या आद्रतेचे प्रमाण तपासून खरेदी केंद्रावर विक्रीला आणावे
नांदेड दि. 31 ऑक्टोबर : शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीकरीता आणण्यापूर्वी व्यवस्थित वाळवून त्यामधील आद्रतेचे प्रमाण हे 12 टक्के पेक्षा कमी असल्याची व एफएक्यू दर्जाचे सोयाबीन असल्याची खात्री शेतकऱ्यांनी करावी. त्यासाठी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आद्रता तपासून ती 12 टक्के पेक्षा कमी असल्यास आपले सोयाबीन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणावे. जेणेकरून जास्त आद्रतेमुळे आपले सोयाबीन परत नेण्याची वेळ येणार नाही, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत करण्यात आले आहे.